7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना ‘इतक्या’ फरकानं वाढणार वेतन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० मे । सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी. कारण, केंद्रामागोमाग आता अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्याही वेतनात वाढ होण्याची चिन्हं आहेत. केंद्रानंतर राज्य शासनानंही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. (Dearness allowance)

सध्या केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता देण्यात आला आहे. त्याच श्रेणीत अनेक राज्यांनीही कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याची तयारी केल्याचं कळत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार असल्याचं कळत आहे.

17 लाख कर्मचाऱ्यांना वेतनवाढ
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) महागाई भत्त्याचा हप्ता वाढवण्याचं ठरवण्यात आलं होतं. यानंतर एरियर म्हणून 5 हप्ते देण्याचीही घोषणा करण्यात आली होती.

सरकारकडून याचे 2 हप्ते आधीच देण्यात आले असून, आता तिसऱ्या हप्त्याची वेळ आली आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

कोणाला मिळणार फायदा ?
2019 मध्ये महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हा आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे.

40 हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत Group A मधील अधिकाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, कारण त्यांच्या वेतनात 30 ते 40 हजार रुपयांची वाढ होणार आहे.

Group B मधील अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा फायदा होणार आहे. तर, Group C अधिकाऱ्यांना 10 ते 15 हजार रुपयांचा फायदा वेतनात होणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 31% आहे. पुढच्या हप्त्याच्या परत्याव्यामध्ये तो वाढून 34 % होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *