![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० मे । सोमवती अमावस्या (Jejuri Somvati Amavasya) म्हणजे भक्तांची अलोट गर्दी… भंडाऱ्याची उधळण… गडावर ‘जय मल्हार…’ नावाचा जयघोष… हा अनुभव भक्तांना दोन वर्षांनी अनुभवता आला आहे… सोमवती अमवस्या असल्यामुळे गड पूर्ण सोनेरी झाला आहे… जेजुरीत यात्रेनिमित्त भाविक मोठया संख्येने येत आहेत.
जेजुरीकरांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. देवसंस्थानच्या वतीने रस्त्याची सफाई, पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर सोमवती यात्रा भाविकांसाठी खुली असणार असल्याने यात्रेला मोठी गर्दी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जेजुरीकरांनी व व्यापारी यांनी तयारी करून ठेवली आहे. भंडारा- खोबरे, प्रसादाची दुकाने सजली आहेत.