महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । जगातील सर्वात मोठय़ा व्हिस्कीच्या बाटलीचा लिलाव नुकताच पार पडला. ही बाटली 5 फूट 11 इंच लांब असून त्यात 311 लिटर व्हिस्की भरलेली आहे. ऑनलाइन लिलावात या बाटलीला 1.4 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 10 कोटी 85 लाख रुपये एवढी किंमत मिळाली.
या व्हिस्कीला ‘द इंट्रेपिड’ असे नाव देण्यात आले असून ती 32 वर्षे जुनी आहे, असे लिलाव कंपनीने सांगितले. व्हिस्की बाटलीची नोंद सप्टेंबर 2021 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. या बाटलीमध्ये सुमारे 444 व्हिस्कीच्या बाटल्यांएवढी दारू असल्याचा दावा केला जात आहे.