Gold- Silver Price Today: सोन्या, चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,७४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,८६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१२ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *