उद्योजक अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ ; मालमत्ता रिकामी करण्यासाठी ED ची नोटीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या (Avinash Bhosale) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने अटक केल्यानंतर, पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांनाही आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुण्यातील मालमत्ता रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे, जी गेल्या वर्षी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एजन्सीने जप्त केली होती.

मनी लाँड्रिंग प्रकरणाव्यतिरिक्त, भोसले यांची ईडीने फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) उल्लंघनासाठीही चौकशी केली होती. येस बँक डीएचएफएल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अविनाश भोसलेला मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यानंतर पुढील तपासासाठी सीबीआयने दिल्लीला नेले आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (ABIL) चे कॉर्पोरेट कार्यालय असलेल्या एआरए मालमत्तेची चार कोटी रुपयांची जमीन ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. भोसले हे एबीआयएलचे प्रवर्तक आहेत. यावेळी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तिच्या जप्तीला आता न्यायनिवाडा करणार्‍या अधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर ईडीने भोसले यांना मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे, जेणेकरून तपास यंत्रणा ती जप्त करू शकेल.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. अविनाश भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल वेस्टिन- पुणे हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा याचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले तेव्हा रिक्षा चालवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. पुढे ते रिक्षा भाड्यानं चालवण्यासाठी देऊ लागले. पुढे अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली आणि अविनाश भोसले रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले. पुढे सासर्‍यांच्या माध्यमातून त्यांना अधिक मोठी काम मिळायला लागली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *