राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार ? : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कोविड टास्क फोर्स बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्स बैठक आयोजित करण्यात आली आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. आज (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईसह राज्यभरात करोना पुन्हा डोकं वर काढत असताना बैठकीतील निर्णयांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मागील दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्या जेमेतम १०० चा टप्पा पार करत होती. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारच्या दिवसात शहरात पाचशेहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली. वाढते पर्यटन, इतर देशांमध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि तिथून येणारे पर्यटक, कोव्हिड चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण, तसेच विषाणूच्या बदलत्या स्वरुपात करोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मुंबईत १२ ते १८ मे या कालावधीत १,००२ नव्या करोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली होती. १९ ते २५ मे या कालावधीत १ हजार ५३१ रुग्णांची नोंद झाली होती. याच कालावधीत पुण्यातील रुग्णसंख्येत ९.७३ टक्क्यांनी घट पाहायला मिळाली. पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये झालेली रुग्णवाढ ही ३५.८६ टक्के आहे. म्हणजेच रुग्णवाढीचा वेग धीमा असून मृत्यूसंख्या वाढलेली नाही.

आरोग्यमंत्र्यांकडून दक्षतेच्या सूचना

– मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरीही स्वतःचा आणि इतरांचाही करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा
– ताप, सर्दी खोकला तसेच इतर कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून घ्यावी
– करोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी
– लसीकरण पूर्ण केले नसल्यास ते करून घ्यावे, बूस्टर मात्रा चुकवू नये
– शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणांमध्ये जाऊ नये
– रुग्णालय, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *