अलविदा केके : पंचत्वात विलीन झाले गायक केके ; मुलीने लिहिली भावूक पोस्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । केके यांचे पार्थिव कोलकात्याहून बुधवारी रात्री मुंबईत आणले गेले, आज वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

बॉलिवूड गायक केके पंचत्वात विलीन झाले आहेत. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. केके यांची मुलगी तमाराने वडिलांच्या फ्यूनरल कार्डसोबत एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिले ‘लव्ह यू फॉरेव्हर डॅडी’. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी कुटुंबीयांनी सकाळी 10:30 ते 12:30 ही वेळ ठेवली होती.

त्यानंतर अंधेरीस्थित त्यांच्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. केके यांच्या अंत्य दर्शनासाठी इंडस्ट्रीतील त्यांचे जवळचे मित्र आणि सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले होते.

सुदेश भोसले, अभिजीती भट्टाचार्य, अलका याज्ञिक यांच्यासह अनेक कलाकारांनी केके यांच्या घरी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *