Monsoon Update : मान्सूनच्या वाटचालीस वेग, मुंबई, पुण्यात पावसाला कधी होणार सुरुवात?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । राज्याच्या सीमेवर मान्सूनने (monsoon update) हजेरी लावली असताना मान्सून पूर्व (pre monsoon rain) पावसाने मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाचा पाऊस झाला, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील(kolhapur, sangli,solapur, konkan heavy rain fall ) काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. 02) कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान मुंबई, पुण्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात तापमानात वाढ झाल्याने मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.

मागच्या 24 तासांमध्ये वर्धा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून पूर्व बांगलादेशपर्यंत पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता.02) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *