महाराष्ट्र २४- ऑनलाईन – लातुर – कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधी मध्ये विविध विलक्षण प्रसंग समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी लातूर शहरांमध्ये एका व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले, त्यांच्या परिवारात अंत्यसंस्कारासाठी इतर सदस्य सोबत नसल्याने शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही मंडळींनी एकत्र येऊन त्यांचा अंत्यसंस्कार पार पाडले. कोरोना विषाणूं च्या भीतीने अनेकवेळा परिवारातील आप्तेष्ट ही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत
याची दखल घेऊन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने यापुढे कोणत्याही कारणाने एखाद्या नागरिकाचे निधन झाल्यास त्यांच्या परिवारातील सदस्य अंत्यसंस्कारासाठी सक्षम नसतील आणि परिवारातील सदस्य सोबत नसतील अशा परिस्थितीमध्ये पिक्चर दिवंगत व्यक्तीच्या धर्माच्या रितीनुसार अंत्यसंस्काराची लातूर शहर महानगरपालिका जबाबदारी उचलणार आहे तसेच याकरिता येणारा खर्चही महानगरपालिकेच्या वतीने उचलला जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये लातूर शहर महानगपालिकेस 9168640649 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.