रुग्णांना मोठा दिलासा ! आता उपचार होणार स्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । आता मनमानी पद्धतीने रुग्णांकडून (patients) पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दिले आहेत. यामुळे आता रुग्णांची लूट करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. एनएमसीने नुकत्याच जाहीर झालेल्या आचारसंहितेत आता डॉक्टरांना (doctor) महागडी ब्रँडेड औषध रुग्णांना विकता यणार नाहीत, असं म्हटलं आहे. तसेच डॉक्टर वैद्यकीय उपकरणं देखील विकू शकत नाहीत. डॉक्टर त्यांच्या रुग्णाला तेच औषध विकू शकतात, ज्या आजारावर ते स्वत:उपचार (Treatment) करतआहेत. रुग्णांचं शोषण होणार नाही याचीही काळजी डॉक्टरांना घ्यावी लागणार आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने डॉक्टरांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. एनएमसीच्याया तरतुदीनंतर छोट्या शहरातील रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण, छोट्या शहरांमध्ये दवाखाने हे चालवणारे डॉक्टर स्वत:ची दुकाने उघडून रुग्णांना औषधे विकत असल्यानं दिसून आलं आहे. लहान शहरे आणि खेड्यातील गरीब लोकांना उपचाराच्या नावाखाली जास्त पैसे खर्च करावे लागतात. पण, आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केलेल्या नव्या बदलांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आता जे विद्यार्थी डॉक्टर आहेत. त्याच्यासाठी देखील नियम आहेत. पहिल्या वर्षांपासून अंतिम वर्षांपर्यंतच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना ते डॉक्टर नसून विद्यार्थी असल्याचं सांगावे लागेल. देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी असे अनेक कायदे आहेत, ज्यामध्ये डॉक्टरांना रुग्णांना औषधे देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी देशात औषधांची दुकाने कमी असायची आणि डॉक्टरांनीही सेवाभाव जपला. जागतिक आरोग्य संघटना देखील परवानगी देते. छोट्या शहरांमध्ये ही तरतूद करण्यात आली. कारण डॉक्टर घरी जाऊन रुग्णावर उपचार करतात.

छोट्या शहरांमध्ये दवाखाने हे चालवणारे डॉक्टर स्वत:ची दुकाने उघडून रुग्णांना औषधे विकत असल्यानं दिसून आलं आहे. लहान शहरे आणि खेड्यातील गरीब लोकांना उपचाराच्या नावाखाली जास्त पैसे खर्च करावे लागतात. यामुळे त्यांची फसवणूक होते. तीच फसवणूक टाळण्याचा हेतू या नव्या नियमातून दिसतोय. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने डॉक्टरांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. एनएमसीच्याया तरतुदीनंतर छोट्या शहरातील रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *