‘प्रवीण मसालेवाले’चे निर्माते हुकमीचंद चोरडिया यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । प्रवीण मसालेवाले (Pravin Masalewale) या प्रसिद्ध ब्रॅन्डचे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (Hukamichand Chordiya) यांचं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. वृद्धापकळानं त्यांचं निधन झालं. प्रवीण मसालेवाले यांच्या आघाडीच्या कंपनीचा जन्म हा हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांच्यामुळेच झाला होता. मसल्यांच्या क्षेत्रात (Spice Industry) गेल्या 40 हून अधिक वर्ष ते आपला दर्जा टिकवून होते. त्यांच्या निधनानं संपूर्ण चोरडिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. घराघरात प्रवीण मसाले हा बॅन्ड पोहोचवण्यात हुकमीचंद यांचा मोठा वाटा होता. हुकमीचंद यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जातेय.

हुकमीचंद चोरडीया हे मूळचे पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातले. त्यांच्या पत्नीने मसाले विकण्याची कल्पना त्यांना सांगितली होती. त्यातूनच कोट्यवधी रुपयांचा उद्योग हुकमीचंद यांनी आपल्या पत्नीच्या साथीनं उभा केला. त्याला वाढवलं. घराघरात प्रवीण मसालेवाले हे एक ओळखीचं नाव होऊ गेलं.
मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले हुकमीचंद चोरडीया यांचा जन्म एका मारवाडी कुटुंबात झाला होता. 1962 साली प्रवीण मसालेवालेची स्थापना केली होती. गेल्या 40 हून अधिक वर्षांपासून ते मसाले उद्योगात आपला दबदबा निर्माण केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *