महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला (Polytechnic Admission) सुरूवात झाली आहे. पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दहावीचा निकाल अजून लागायचा आहे त्यामुळे हा निकाल लागायच्या आधीही तुम्ही प्रवेशासाठी अर्ज करू शकता. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून याची घोषणा करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी पॉलिटेक्निक प्रवेशाची माहिती देण्यात आली. आजपासून दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.
पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दहावीचा निकाल अजून लागायचा आहे त्यामुळे हा निकाल लागायच्या आधीही तुम्ही प्रवेशासाठी अर्ज करू शकता. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून याची घोषणा करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना गमावलं आहे, अश्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दोन जागा राखीव असतील. शिवाय त्यांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून पन्नास हजार रुपये खर्च केला जाणार आहे.
निकालाआधीही अर्ज करता येणार
दहावीचा निकाल अजून लागायला आहे. त्याआधीही तुन्ही प्रवेशासाठी अर्ज करू शकता. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन पोर्टलवर आपले दहावीचे मार्क अपलोड करता येतील. त्यानंतर त्याची मेरिट लिस्ट जाहीर होईल. अन् पुढची प्रवेश प्रक्रिया पार पडेल. यंदा पॉलीटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमाला अधिक प्रवेश होतील, असा विश्वास असल्याचं राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी व्यक्त केला आहे.