साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 5 ते शनिवार 11 जून 2022

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जून ।

मेष :- मेहनत घ्यावी लागेल.
बुध-प्लुटो त्रिकोणयोग, शुक्र-हर्षल युती होत आहे. तणावाचा, वादाचा प्रसंग निर्माण होईल. सहकार्याच्या भावनेतून प्रत्येक काम करा. व्यवसायात सुधारणा करता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. घरातील समस्येवर उपाय शोधता येईल.शुभ दिनांक :- 6, 11

वृषभ :- . भागीदारीत गैरसमज होईल
चंद्र-गुरू प्रतियुती, बुध-प्लुटो त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीलाच करा. भागीदारीत गैरसमज होईल. व्यवसायात हिशेबात चूक नको. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी नेते यांना न दुखावता काम करा. स्वत:ची फसगत टाळता येईल.शुभ दिनांक :- 5, 6

मिथुन :- कामात अडचणी आल्या तरी कामे करून घ्या
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. महत्त्वाच्या कामात अडचणी आल्या तरी कामे करून घ्या. अहंकाराची भावना ठेवल्यास नोकरीत अडचणी येतील. धंद्यात गिऱ्हाईक वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही प्रश्न तटस्थ राहून सोडवा. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील.शुभ दिनांक :- 6, 7

कर्क :- धंद्यात चांगला जम बसेल.
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, शुक्र-हर्षल युती होत आहे. महत्त्वाचा प्रश्न रेंगाळत ठेवू नका. कठीण कामे करून घ्या. धंद्यात चांगला जम बसेल. नोकरीत फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा पाया भक्कम कराल. कार्यपद्धती ठरवून ध्येय गाठा. कुटुंबातील समस्या कमी होतील.
शुभ दिनांक :- 6, 7

सिंह :- तुमच्या कामात प्रगती कराल.
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, शुक्र-हर्षल युती होत आहे. सोमवारपासून तुमच्या कार्याला गती मिळेल. राग वाढवणाऱ्या घटनांवर मात करून तुमच्या कामात प्रगती कराल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. नोकरीतील कठीण कामे मार्गी लावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्दीने प्रश्न सोडवू शकाल.शुभ दिनांक :- 8, 11

कन्या :- सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील
चंद्र-गुरू प्रतियुती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई नको. धंद्यात फसगत टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहून व्यक्त व्हा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील. मानप्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात खर्च वाढेल.शुभ दिनांक :- 5, 11

तूळ :- कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
चंद्र-गुरू त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तडजोडीचे धोरण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. धंद्यात मर्यादा सोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच कुचकामी ठरवण्याचा प्रयत्न होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कोर्टाच्या कामात बेसावध राहू नका.शुभ दिनांक :- 5, 6

वृश्चिक :- विरोधकांना कमी लेखणे त्रासदायक
चंद्र-गुरू प्रतियुती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. बुद्धिचातुर्यानेच विरोधकांना हाताळावे लागेल. कठीण कामे रेंगाळत ठेवू नका. धंद्यात तणाव येईल. मैत्रीत गैरसमज होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भेदभाव नको. विरोधकांना कमी लेखणे त्रासदायक ठरेल.शुभ दिनांक :- 5, 6

धनु :- संयम बाळगा.
चंद्र-शनी प्रतियुती, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. प्रवासात सावध रहा. धंद्यात कायदा पाळा. कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल. प्रतिष्ठा जपा. स्पर्धेत टिकून राहणे सोपे नाही. संयम बाळगा. प्रकृतीची काळजी घ्या.शुभ दिनांक :- 6, 8

मकर :- मानप्रतिष्ठा वाढेल.
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. कुणालाही कमी लेखू नका, म्हणजे वर्चस्व वाढेल. धंद्यात गोड बोला. नोकरीत कठीण काम करण्यात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. मानप्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील कामे करून घ्या.शुभ दिनांक :- 9, 10

कुंभ :- तटस्थ भूमिका घ्यावी
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. तणाव, चिंता निर्माण होईल. धंद्यात वाढ झाली तरी खर्च वाढेल. सहनशीलता ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. सामाजिक क्षेत्रात धावपळ, दगदग वाढेल. कोणतेही मत व्यक्त करताना घाई नको. तटस्थ भूमिका घ्यावी लागेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिद्द ठेवा.शुभ दिनांक :- 6, 7

मीन :-कोणताही धोका पत्करू नका.
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, बुध-हर्षल युती होत आहे. किरकोळ वाद वाढवू नका. सलोख्याने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणताही धोका पत्करू नका. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढत जाणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढत आहे.शुभ दिनांक :- 8, 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *