तुम्ही नसता तर मी नसतो, अशोक सराफ यांचे कृतज्ञ उद्गार

 61 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जून । मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचा प्रयोग सादर करत आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. अमृत महोत्सवी वाढदिवस आणि अभिनय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याचा दुग्धशर्करा योग साधत अशोक सराफ यांनी चाहत्यांना ही खास भेट दिली. शिवाजी मंदिर, दादर येथे हा प्रयोग रंगला.

अशोक सराफ, निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’चा प्रयोग रविवारी रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला. मध्यंतरात अशोक सराफ यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी ‘जाऊ बाई जोरात’ या नाटकातील कलाकारांनी अशोक सराफ यांचे औक्षण केले. अशोक सराफ यांच्या परिवारासह निर्मिती सावंत, चिन्मय मांडलेकर, दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर, प्रणित बोडके आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही नसता तर मी नसतो. आजही तुम्ही मोठय़ा संख्येने माझं नाटक बघायला आलात. एकही सीट रिकामी नाही. मी कधीही हे विसरणार नाही. प्रेक्षकांमुळे माझा उत्साह वाढतो, नव्याने काम करण्याची हौस निर्माण होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पाध्ये बंधूंनी त्यांची भेट घेत सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *