महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे- अनेक राज्यातील लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा झाली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा उद्याचा (दि.१४) दिवस अखेरचा आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता.१४) सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी उद्या नवी घोषणा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रत्येकजण ज्या प्रश्नाची वाट पाहत होता त्याचे उत्तर उद्या मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. २१ दिवसाचा लॉकडाऊनही उद्याच संपत आहे. लॉकडाऊन पुढे जाईल की नाही? याबाबत पंतप्रधान स्वत: पुढची योजना सांगू शकतात.
आज मोदींच्या अभिभाषणाबाबत चर्चा होत होती. परंतु, नंतर ते स्वतः सरकारी सूत्रांनी नकारले. यापूर्वीच देशभरात कोरोना विषाणूचा लॉकडाऊन वाढण्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्या बैठकीत लॉकडाऊन कमीत कमी दोन आठवडे म्हणजेच संपूर्ण एप्रिल महिन्यात वाढविण्यात यावा, असे या बैठकीत स्पष्ट झाले आहे. आता हे उद्या मोदी स्वत: जाहीर करतील अशी शक्यता आहे.