पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे- पिंपरी : शहरातील आणखी चौघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. त्यामुळे बाधितांची संख्या 35 झाली आहे. तर, एका 42 वर्षीय व्यक्तीचा रविवारीच उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील कोरोनाचा ते पहिला बळी ठरले. महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 12 जण उपचारानंतर बरे होऊन घरी पोचले आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या बारा तासांत आणखी चौघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संख्या 35 झाली आहे. सध्या 22 जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, रविवारी मृत्यू झालेली व्यक्ती गुरुवारी (ता. 9) वायसीएममध्ये दाखल झाली होती. तत्पुर्वी श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने घरानजिकच्या दवाखान्यात ते गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना वायसीएममध्ये पाठवले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांचा एनआयव्हीकडील अहवाल शुक्रवारी पाॅझिटिव्ह आला होता.

हिंजवडी परिसरात ते कंत्राटी कामगार होते. मात्र, त्यांचा आयटी पार्कमधील कंपण्यांशी काही संबंध नव्हता. दरम्यान, रविवारपर्यंत एकूण 822 व्यक्तींच्या घशातील नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले. त्यातील 730 निगेटिव्ह आले आहेत. रविवारी 65 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील चौघांचे अहवाल रविवारी रात्री उशिरा पाॅझिटीव्ह आलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *