महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे : पुण्यातल्या सगळ्या खाजगी डॉक्टरांच्या सेवा आपत्ती नियमन कायद्या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिग्रहित केल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व खासगी डॉक्टर्सना आता कोरोनाग्रस्तांवर उपचार करावे लागणार आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारकडे असे अधिकार असतात. त्याचाच वापर केला गेला आहे.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले हे गरजे प्रमाणे नियोजन करून सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोनाच्या उपचारासाठी बोलवणार आहेत. सेवा देण्यसाठी या डॉक्टरांना सरकारी मोबदला देण्यात येणार असल्याची ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.