राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ !, १३५ टक्के रुग्णवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असून,मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या रुग्णसंख्येमध्ये १३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

मुंबईमध्ये २३ ते २९ मे या कालावधीमध्ये २०७० रुग्णांची नोंद झाली होती ३० ते ५ जून या कालावधीमध्ये रुग्णसंख्येत वाढ होऊन ती ४,८८० इतकी नोंदवण्यात आली आहे. टक्केवारीमध्ये ही वाढ १३५.७५ आहे. ठाण्यात १९१.५७, पुणे येथे ५०.७० तर रायगडमध्ये १३०.१९ व पालघरमध्ये ३५० टक्क्यांची रुग्णवाढ झाली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये याच कालावधीमध्ये २,९९२ रुग्णसंख्या वाढून ७,०५१ झाली आहे. ही वाढ १३५.६६ टक्क्यांची आहे. राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये ३४.६७ टक्क्यांची वाढ दिसून येते.

१ मे रोजी मुंबईमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या ९९५ इतकी होती १८ मे रोजी ती वाढून राज्यात १,६०५ इतकी नोंद करण्यात आली, त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम राहिला असून ३० मे रोजी २९९७ तर १ जून रोजी ३४७५, ३ जून रोजी ४५५९, ४ जून रोजी ५१२७ तर ५ जून रोजी ५८८८ उपचाराधीन रुग्णांची मुंबईत नोंद झाली आहे.

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
केरळमध्ये सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असून, ही संख्या ८८३५ इतकी आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रामध्ये ६,७६७ तर कर्नाटकमध्ये २४१४, दिल्लीमध्ये १४२२ तर हरियाणामध्ये ९१३ रुगणांची ५ जून रोजी नोंद झाल्याचे आरोग्यविभागाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *