सोन्यापाठोपाठ बिहारमध्ये आता पेट्रोल खाण ? ; ONGC च्या संशोधनाला मंजुरी…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । बिहारमध्ये पेट्रोलची खाण (Petrol Mine) असल्याची चर्चा आहे. ONGC च्या संशोधनालाही मंजुरी देण्यात आली आहे. एकीकडे बिहारच्या (Bihar) जमुईमध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण असल्याची बोललं जातं. तर दुसरीकडे बक्सर आणि समस्तीपूरमध्ये पेट्रोलचा (Petrol) साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील 308 किमी आणि बक्सरच्या 52.13 चौरस क्षेत्रामध्ये पेट्रोलचा साठा असण्याची शक्यता आहे. याबाबत संशोधन करण्यासाठी बिहार सरकारने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) च्या अंदाजानुसार बक्सर 52.13 किमी आणि समस्तीपूरमध्ये तेलाचा मोठा साठा असू शकतो. ONGC ने बिहारच्या खाण आणि भूविज्ञान संशोधन विभागाकडून पेट्रोलियम उत्खननासाठी परवानगी मागण्यात आली आहे. सध्या देशाची पेट्रोल डिझेलची गरज वाढत आहे. त्यामुळे हे संशोधन महत्वपूर्ण राहिल.

ONGCने बक्सर जिल्हा प्रशासनालाही पत्र पाठवलं आहे. त्यामुळे जुमुई, बक्सर भागात पेट्रोलचा साठा असल्यास ते देशाच्या आणि बिहारच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचं असेल. गंगा नदीच्या खोऱ्यात पेट्रोलियम पदार्थ असू शकतात, असं पत्र जिल्हा प्रशासनाला मिळालं असल्याचं बक्सरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. “समस्तीपूरच्या गंगा नदी खोऱ्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या शोधासाठी केद्र सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ला मान्यता दिली आहे. पेट्रोलियमचे साठे सापडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. समस्तीपूरमध्ये 308 किमी चौरस परिसरात पेट्रोल सापडण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर व्हावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कायम वाटतं. खनिज तेलासाठी आम्हाला इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नसावी. त्यासाठी हे संशोधन महत्वपूर्ण असेल”, असं ते म्हणाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *