महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । बारावीचा निकाल येत्या तीन दिवसात कधीही जाहीर केला जाण्याची शक्यता होती. अखेर बोर्डाकडून ८ जून तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे देव पाण्यात असल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील वेबसाईटवर वर निकाल पाहू शकतील.
बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहातायत. अखेर तारीख जाहीर झाली आहे. (Maharashtra state board will declare HSC result in this week)