आता कर्जे देखील महाग ; रिझव्‍‌र्ह बँकेकडून अर्धा टक्का व्याजदरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । MSBSHSE 12th Result 2022 : महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेनुरूप व्याजदरात अर्धा टक्क्याची वाढ केली. महिनाभरात झालेल्या दुसऱ्या तर दशकभरातील सर्वात मोठय़ा दरवाढीमुळे गृह, वाहन तसेच अन्य कर्जदारांवर मासिक हप्त्याचा भार वाढणार आहे. या निर्णयाच्या अपेक्षेने अनेक बँकांनी कर्ज व्याजदरात पतधोरणापूर्वीच वाढ केली.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसीय बैठकीअंती व्याजदर वाढीचा हा निर्णय

एकमताने घेण्यात आला. रेपो दरातील सलग दुसऱ्या वाढीनंतरही, हे दर करोनापूर्व ५.१५ टक्क्यांच्या पातळीपेक्षा कमीच आहेत, असे गव्हर्नर दास यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. शिवाय करोना साथीच्या काळात स्वीकारलेल्या ‘परिस्थितीजन्य उदारते’च्या भूमिकेत बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेच त्यांनी सूचित केले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई दरातील वाढीचा अंदाज कायम ठेवत चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मात्र सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज ७.२ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. महागाई दरासंबंधी अंदाजातील एका टक्क्याची वाढ ही युक्रेनमधील युद्धामुळे खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे असल्याचे नमूद करताना, ‘युद्धामुळे महागाईचेच जागतिकीकरण झाले आहे,’ असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *