पुणेकरांना महागाईचा आणखी एक धक्का ; सीएनजीच्या दरात भाव वाढ सुरूच ; जाणून घ्या नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । देशासह राज्यात महागाईचा (Inflation) भडका उडला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणेकरांना महगाईचा आणखी एक धक्का बसला आहे. पुण्यासह पिंपरी चिंडवडमध्ये सीएनजीच्या दरात (CNG rate) दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, पुण्यात (Pune) आता एक किलो सीएनजीचे भाव 82 रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांना पसंती मिळत आहे. सीएनजी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सीएनजीची मागणी देखील वाढली आहे. सीएनजीच्या मागणीत झालेली वाढ आणि स्थानिक पातळीवर असेलेली सीएनजीची कमतरता यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

सीएनजीच्या दरात भाव वाढ सुरूच आहे. एक एप्रिलपासून ते आतापर्यंत सीएनजीच्या दरात तब्बल चारवेळा भाववाढ करण्यात आली आहे. 28 एप्रिल 2022 ला सीएनजीचे दर प्रति किलो 77.20 रुपये एवढे होते. त्यानंतर 20 मेला सीएनजीच्या दरात पुन्हा दोन रुपयांची भाववाढ करण्यात आली. आता पुन्हा एकदा बुधवारी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचे दर प्रति किलो 82 रुपयांवर पोहोचले आहेत. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने रिक्षा चालकांनी भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. सीएनजीचे दर सातत्याने वाढत असून, त्याचा मोठा फटका हा व्यवसायिक वाहनांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *