Devendra Fadnavis : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, बैठकांना सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । ज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना लातूर दौऱ्यावर असताना अचानक ताप आला होता. आपला दौरा रद्द करून ते तातडीने मुंबईत परतले होते. त्यानंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली होती. त्यानंतर फडणवीस यांनी जनसंपर्क, बैठक, चर्चा यांना उपस्थिती दर्शविली नव्हती. मात्र, आता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित रहाणार आहेत.

फडणवीस यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह झाले आहेत. आज दुपारी ३ वाजता ताज हॉटेल येथे होणाऱ्या भाजपच्या बैठकीला ते उपस्थित रहाणार आहेत.

तर, राजसभा आणि विधान परिषद निवडणुकीसंदर्भात त्यांनी आज सकाळी गिरीश महाजन, आशिष शेलार, श्रीकांत भारतीय, विनायक मेटे यांच्याशी सागर बंगल्यावर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *