![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० जून । वार्षिक आधारावर सीएनजीच्या दरात ७४ टक्के वाढ झाल्यामुळे मे महिन्यात सीएनजीवर चालणाऱ्या कारच्या विक्रीत ११.५८ टक्के घसरण झाली आहे.मार्चमध्ये सीएनजीचे दर ३५,०६९ रुपयांवर पोहोचले होते. हा सार्वकालीन उच्चांक ठरला होता. त्यानंतर सीएनजी पेट्रोलवर चालणाऱ्या कारची विक्री ११.५८ टक्क्यांनी घटून ३१,००८ वर आली. सीएनजी महागल्यामुळे विक्री घटल्याचे जाणकारांनी सांगितले की, या कालावधीत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची विक्री मात्र १२.८८ लाखांवरून वाढून १३.५६ लाखांवर गेली.मार्चपासून आतापर्यंत सीएनजीचा दर १८ ते २० रुपयांनी महागला आहे. या काळातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ मात्र नाममात्र राहिली आहे.
नाहक खर्च कशाला?
– इंडियन ऑटो एलपीजी कोअलिशनचे महासंचालक सुयश गुप्ता यांनी सांगितले की, सीएनजी गॅस आणि सीएनजी किट महागल्यामुळे एक पर्यायी इंधन म्हणून सीएनजीच्या स्थानाला धक्का बसला आहे.
– सीएनजी वाहने चालविणे आता महाग होत चालले आहे. या कारची किंमत पेट्रोल कारच्या तुलनेत अधिक असते. सीएनजी महागल्यामुळे या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे.