राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० जून । हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचं दिसत आहे.

राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या 48 तासांत मान्सून दाखल होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *