शेअर बाजारात प्रचंड घसरण ; गुंतवणूकदारांची चौफेर विक्री ; कोटींचा चुराडा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० जून । अमेरिकेत वाढलेली महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या व्याजदर वाढीचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावून पैसे काढून घेतल्यानं बाजार सुरु होताच दोन्ही निर्देशांकात प्रचंड घसरण झाली. सेन्सेक्स ६०० अंकांनी घसरला असून निफ्टीत २०० अंकांची घसरण झाली आहे. या पडझडीत गुंतवणूकदारांना दोन ते अडीच लाख कोटींचे नुकसान सोसावं लागले.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव १२२ डॉलरवर गेला आहे. मात्र चीनमध्ये करोना संकट तीव्र झाले आहे. काही शहरांमध्ये कडक टाळेबंदी लागू झाल्याने कच्च्या तेलाच्या मागणीत घसरण झाली. चीनमधील लॉकडाऊनमुळे आशियातील गुंतवणूकदार भयभीत झाले आहे. त्यांनी आशियातील इतर उदयोन्मुख बाजारांतून काढता पाय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *