राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा ; काय आहे पावसाचा अंदाज?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० जून । मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त पुढे गेल्याने त्याची कसर भरून काढण्याचे काम गुरुवारी मान्सूनपूर्व सरींनी केले. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर भागांतही पावसाचे आगमन झाले. विदर्भातील नागरिकही पावसाकडे टक लावून बसले आहेत. येत्या सात दिवसांत विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

उन्हाचे चटके सोसणाऱ्या पश्चिम विदर्भाला मान्सूनची प्रतीक्षा आहे. मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळल्याने त्याच्या आगमनाला विलंब झाला. मात्र येत्या ४८ तासांत मान्सूनचा पाऊस दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात येण्यास परिस्थिती अनुकूल झाली. त्यानंतर मान्सूनची आगेकुच सुरू राहील, अशी माहिती अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिली. १४ ते १६ जून दरम्यान, विदर्भात विखुरलेल्या स्वरुपात हलका ते मध्यम पाऊस राहील, असेही ते म्हणालेत.

१२ आणि १३ जून रोजी अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळात पावसाची शक्यता. उर्वरीत जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. वाशीम, यवतमाळ, गडचिरोलीत वादळी पाऊसाचा अंदाज. ११ जून रोजी अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियांत मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता आहे. तर अकोला, बुलडाणा, वाशीम, वर्धा, नागपूर व भंडाऱ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. १० जून ला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस येवू शकतो.

मुंबईमध्ये शुक्रवार, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाण्यामध्ये सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मुंबईला शुक्रवार, शनिवारी तर ठाण्याला सोमवारपर्यंत यलो अॅलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच विदर्भाच्या जिल्ह्यांमध्येही सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर येथे शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *