ऋतू बदल ; पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० जून । ऋतू बदलला की, सगळ्यात आधी आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाच्या पाण्यात भिजल्याने आपले आरोग्य बिघडते. या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Monsoon Health Tips in Marathi)

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याकडे अधिक भर देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते तसेच प्रतिकारशक्तीकडेही लक्ष द्यावे लागते. अशावेळी आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी? हे जाणून घेऊया.

# पावसाळ्यात अधिकतर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते व त्यामुळे आपण आजारी पडतो. अशावेळी आपण व्हिटॅमिन-सी (Vitamins) किंवा हंगामी फळे, जांभूळ, डाळिंब, सफरचंद, बेरी व लिचीचे यांसारख्या फळांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा.

# हवामानातील बदलामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्याही सुरू होतात. त्यातून सुटका मिळवण्यासाठी आहारात प्रोबायोटिक्सचे प्रमाण समाविष्ट करणे गरजेचे आहे. प्रोबायोटिक्समध्ये आरोग्याला हवे असणारे गुणधर्म आहेत. यासाठी पोट बिघडल्यावर लस्सी किंवा ताकाचे सेवन करा. तसेच भाताची पेच बनवून त्याचे ही सेवन केल्यास फायदा होईल.

# पावसाळ्यात (Monsoon) आपले केस गळू लागतात. पण जास्त केस गळणे देखील चांगले नाही. या ऋतूत केसांची काळजी घेण्यासाठी आपण प्रोटीन आणि व्हिटॅमिन-सीचे प्रमाण वाढवू शकतो त्यामुळे केसांना त्याचा फायदा होईल. तसेच पावसाळ्यात अंडी व मांस कमी खावे किंवा खाताना ते नीट स्वच्छ झाले आहे की नाही हे तपासून पहा. त्यांना योग्यप्रकारे शिजवून मगच त्याचे सेवन करा.

# पावसाळ्यात किडे व जंत वाढण्याचे प्रमाण अधिक वाढते. अशावेळी आपण हिरव्या पालेभाज्याचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. या दिवसात आहारात कडधान्यांचा समावेश अधिक करायला हवा

# पावसाळ्यात स्किन इन्फेक्शन किंवा खाज येण्याची समस्या अधिक वाढते. त्यात अनेकांना फंगल इन्फेक्शनही होते. हे टाळण्यासाठी आपण दररोज कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करू शकतो.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *