महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१०जून । थांयलंडमध्ये भांगची म्हणजेच मारिजुआना (Marijuana) बाळगणे, त्याची लागवड करण्यास गुरुवारी कायदेशीर करण्यात आले आहे. याशिवाय देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी गांज्याच्या 10 लाख बियांचे वाटप करण्याची योजना आखली असून, अन्न आणि औषध प्रशासनानं गांजा औषध श्रेणीतून काढून टाकले आहे. त्यामुळे थांयलंड (Thailand) हा आशियातील पहिला देश बनला आहे, जिथे वैद्यकीय आणि औद्योगिक वापरासाठी गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Marijuana Legalize In Thailand)
थायलंडला ‘वीड वंडरलँड’ म्हणून विकसित करायचे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. त्यासाठी थायलंडमधील लोकांना वैद्यकीय कारणास्तव गांजाचे उत्पादन, खाणे आणि विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, गांज्या पिकातून बक्कळ कमाई होईल अशी आशा थांयलंड सरकारला असून, यामुळे कोरोनाकाळात कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्यास मदत होईल. दरम्यान, गांजाला कायदेशार परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला.