प्रतीक्षा संपली ; गोवा आणि दक्षिण कोकणात मान्सून दाखल imd कडून माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१०जून । मागच्या कित्येक दिवसापासून मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Update) प्रतिक्षा लागून राहिली होती ती अखेर आज (दि.10) संपली. तळकोकणातून मान्सूनचा (Konkan monsoon rain) महाराष्ट्रातील प्रवास सुरू झाला आहे. याबाबत खात्रीलायक माहिती हवामान विभागाकडून (imd alert monsoon) देण्यात आली आहे. मान्सून महाराष्ट्रातील किनारी भागात पोहचला असून कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान झाल्यानं राज्यात पूर्वमोसमी पावसानं काल अनेक ठिकाणी हजेरी लावली.

राज्यात मान्सून लांबणीवर (Maharashtra monsoon) पडणार अशी चर्चा सुरु असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (imd) या सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. असे सांगण्यात आले आहे.

31 मे ते 7 जून दरम्यान मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापल्याचे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले. मान्सूनच्या वाटचालीस कोणताही विलंब झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबई व्यापेल, हवामान विभागाचे अधिकारी जेनामनी म्हणाले.

आम्हाला खात्री आहे कि पुढच्या 48 तासांत मान्सून राज्यात दाखल होणार आहे. दरम्यान त्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात मान्सून वारे वाहत आहे. तसेच ढग तयार होऊ लागल्याने मान्सूनला जास्त काळ लागणार नसल्याचे जेनामनी यांनी सांगितले.

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली. दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. रायगडमधील माणगाव, महाड, गोरेगाव भागात पाऊसाने जोरदार बॅटींग केली. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. मान्सूनपूर्व पावसाचे कोकणातील काही भागातही आगमन झाले. आज कोकणातील काही भागात तुरळक पाऊस पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *