महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ जून । हिमालयाच्या (Himalaya) दुर्गम भागातल्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीतल्या महत्त्वाच्या तीर्थयात्रांमध्ये अमरनाथ यात्रेचा समावेश होतो. यंदाची अमरनाथ तीर्थयात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून, ती 43 दिवस सुरू असेल. 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाच्यादिवशी ही यात्रा संपेल. त्या निमित्ताने, या आश्चर्यकारक तीर्थस्थळाविषयी, तसंच तीर्थयात्रेविषयी सविस्तर माहिती घेऊ या. ‘एएसबी न्यूज इंडिया’ या पोर्टलने याबद्दलचं वृत्त, तसंच अमरनाथबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.