Pune : पुणेकरांची (Pune) डोकेदुखी वाढली ; दोन दिवसात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ जून । राज्यात अनेक जिल्ह्यात पु्न्हा कोरोनाने (Corona) डोके वरती काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले आहे. मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग अत्यंत अल्प प्रमाणात होता. त्यानंतर कोरोना संसर्ग महाराष्ट्रात (Maharashtra) वाढत असल्याची आकडेवारी वाढली आहे. तसेच राज्य शासनाकडून परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पुन्हा नियमावली लागू होऊ शकते असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना पुणेकरांची (Pune) डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसात साधारण जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी काळजी घेतल्यास कोरोना वाढणार नाही असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात कमी झालेला कोरोना बाधित दर पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसात जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत. बाधित दर हा 4.6 टक्क्यांवर गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील चाचण्या वाढवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेत. रुग्णालयात भरती होणाऱ्यांच प्रमाण कमी असलं तरीही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग अनेकांना होत असल्याने आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक कोरोना बाधितांची रूग्ण संख्या वाढत असल्याने अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संशयास्पद असणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. दोन वर्षापुर्वी कोरोनाने संबंध देशात हाहाकार माजवला होता. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारपर्यंत शहरात 585 सक्रिय प्रकरणे होती. त्यापैकी 318 रुग्णांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. सर्वाधिक रूग्णांची संख्या ही 31-40 वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *