काळजी घ्या चौथ्या लाटेची चाहुल …! रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीत मोठी घट होत आहे. गेल्या 18 दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी 3,561 दिवसांवरून थेट 561 दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोरोनाची सध्याची रुग्णवाढ चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत देत आहे.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढय़ामुळे तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करण्यात यश आले. मात्र एप्रिल 2022 मध्ये कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या थेट 35 पर्यंत खाली आली होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांवर नोंद होत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असतानाच कानपूर ‘आयआयटी’ने जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येईल असा इशारा दिला होता. या इशाऱयानुसारच सध्या रुग्णवाढ होत असल्याने मुंबईत खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

25 मे – 3973
1 जून – 2027
2 जून – 1765
3 जून – 1576
4 जून – 1396
5 जून – 1204
6 जून – 1051
7 जून – 986
8 जून – 866
9 जून – 733
10 जून – 642
11 जून – 561
मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि दुसऱया लाटेत रुग्ण संख्या 11 हजारांवर पोहोचली होती. तर चौथ्या लाटेचा शिरकाव झपाटय़ाने होत असून रोज आढळणारी रुग्णसंख्या सुमारे दोन हजारच्या जवळपास पोहचली आहे.

दरम्यान, रुग्णवाढ होत असली तरी कोरोना मृत्यूची नोंद बहुतांशवेळा शून्य होत असल्याने स्थिती समाधानकारक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *