NCP Meeting : सिल्वर ओक वर आज राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक ! पुढची रणनिती ठरणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३जून । राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP Meeting) बैठक आज होतेय. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक (Silver oak) निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. शरद पवार (Sharad Pawar)यांनी ही बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवानंतर शरद पवार सतर्क झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीसारखा अनुभव आगामी निवडणुकांमध्ये येऊ नये, यासाठीची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक घेतली जातेय. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते या बैठकील हजर आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात होता. दरम्यान, शरद पवार यांनी या पराभवाने कोणताही धक्का लागलेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडतेय. या बैठकीत आगामी राजकीय रणनिती काय ठेवायची? याबाबत विचारमंथन केलं जाणार आहे. विधानपरिषद, पालिका निवडणुका, तसंच इतर महत्त्वाच्या प्रश्नांच्या अनुशंगाने शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *