संजय राऊतांची खासदार की जाणार? किरीट सोमय्या दिल्लीला रवाना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । महाराष्ट्रात नुकत्याच राज्यसभा निवडणुका संपल्या आहेत. भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत धनंजय महाडिकांचा विजय खेचून आणला. जोरदार शक्तीप्रदर्शनही झालं. येत्या २० तारखेला पार पडणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी हा रिझल्ट निर्णायक मानला जातोय. मात्र त्याआधीच किरीट सोमय्यांनी पुन्हा दिल्लीचा रस्ता धरला आहे. यावेळी त्यांनी राऊत यांची राज्यसभेवरील खासदारकी रद्द करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. (Kirit Somaiya Alleges Sanjay Raut over Rajysabha Election 2022)

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. सरकारमधील अन्य पक्षांचा प्रत्येक उमेदवार निवडून आला. मात्र, शिवसेनेचा दुसरा उमेदवार पडल्याने हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील कट-टू-कट मतांनी विजयी झाले. मात्र, आता किरीट सोमय्या ही उमेदवारीच रद्द करण्याची मागणी करणार आहेत. यासाठी त्यांनी दिल्लीचा रस्ता धरलाय.

यंदा राज्यसभा निवडणुकीत आयोगाची भूमिका महत्वाची ठरली. भाजपच्या सदस्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका अन्य व्यक्तींना दाखवल्याचा आरोप केला होता. यानंतर मविआ सरकारने रवी राणांवरही आरोप केला आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. राज्यातील निवडणूक आयोगाने दिल्लीतील मुख्य निवडणूक सचिवांकडे धाव घेतली आणि राज्यात समीकरणं फिरली. कारण दिल्लीतून निर्णय आल्यानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनाही मतदान करता आलं नव्हत. त्यातच ज्यादाचं मत बाद झाल्याने मविआच्या उमेदवारा फटका बसला.

आता सोमय्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर यामध्ये आणखी काही बदल झाले तर राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *