महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । शेअर बाजारात (Share Market) आज मोठी घसरण पाहायला मिळत आहेत, मात्र सराफा बाजारात आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ (Gold-Silver Price Increased) झाली. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत, ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात, 47,300 रुपयांच्या आसपास आहेत. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold rate today) 722 रुपयांनी वाढून 51,657 रुपयांवर पोहोचला. तर, चांदीचा भाव (Silver Rate Today) 61,325 रुपयांवर उघडला.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 51,657 रुपये आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50935 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 722 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे. मात्र तरीही सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,543 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, आज चांदीचा दर 61325 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 60,881 प्रति किलोच्या दराने बंद झाला होता. त्यामुळे आज चांदीचा दर 444 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.
सोने-चांदीचे दर
>> सोने 999 – (24 कॅरेट)- 51657 रुपये/तोळे
>> सोने 995 – (23 कॅरेट) 51450 रुपये/तोळे
>> सोने 916 – (22 कॅरेट) 47318 रुपये/तोळे
>> सोने 750 – (18 कॅरेट) 38743 रुपये/तोळे
>> सोने 585 – (14 कॅरेट) 30219 रुपये/तोळे
>> चांदी 999 – 61325 रुपये/किलो