महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी तो इंग्लंड संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. याबाबत त्याने इंग्लंडचे नवनिर्वाचीत प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम ( England new head coach, Brendon McCullum) यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर 2021 मध्ये मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्याने 64 कसोटींत 195 विकेट्स घेतल्या, शिवाय त्याच्या नावावर पाच शतकंही आहेत.
दरम्यान, ब्रेंडन मॅक्युलमच्या येण्याचे इंग्लंडच्या संघाने अधिका आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी वन डे मालिकेसाठी मोईऩ अली नेदरलँड्स येथून रवाना झाला आहे. ”ब्रेंडन मॅक्युलमला जेव्हा वाटेल, तेव्हा मी नक्की पाकिस्तानात खेळेन,”असे अलीने BBC सोबत बोलताना म्हटले. 2005 नंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावर मोईन अलीचा चुलत भाऊ कबीर अली हा इंग्लंडच्या संघाचा सदस्य होता. मोईन अली म्हणाला,”पाकिस्तानमध्ये प्रेम व पाठिंबा मिळतो, हे मला माहित्येय. कारण तेथील लोकं क्रिकेटवर प्रेम करतात.”
मोईन अलीने ब्रेंडन मॅक्युलमसोबत चर्चा झाल्याचे सांगितले आणि त्यानंतरच निवृत्तीचा निर्णय त्याने मागे घेतला. त्याने मॅक्युलम व बेन स्टोक्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.