IND vs SA 2nd T20 : तिसऱ्या टी20 सामन्यासापूर्वी जाणून घ्या पिचची स्थिती, मैदानावरील रेकॉर्ड्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा टी20 सामना कटकच्या बाराबती मैदानात (Barabati Stadium, Cuttack) खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारत पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका विजय मिळवून आघाडी वाढवण्याची प्रयत्नशील असेल. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे.

सामना पार पडणाऱ्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत चांगली असल्याने नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मैदानावर सर्वाधिक स्कोर 127 आणि सर्वात कमी 82 रन इतका आहे.

डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमरील खेळपट्टी गोलंदाजासाठी अधिक चांगली आहे. याआधीही याठिकाणी गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे फलंदाजांना रिस्क अधिक असल्याने सांभाळून खेळावं लागेल. यावेळी फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने सामना संपूर्ण षटकांचा होईल. त्यात समुद्रकिनारा जवळ असल्याने हवा अधिक असल्यास गोलंदाजांना अधिक मदत होईल.

ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल,अर्शदीप सिंह/उमरान मलिक.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आठ सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. आता देखील मालिकेतील पहिले दोन सामने आफ्रिकेने जिंकत मालिकेत वर्चस्व मिळवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *