Monsoon Update : मान्सून ; राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा alert

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । मागच्या 24 तासांत, राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या (Maharashtra pre monsoon rain) मध्यम ते तीव्र सरी पडल्या; नाशिक, नागपूर, औरंगाबाद, परभणी, मालेगाव, नंदुरबार, रत्नागीरी, सिंधूदुर्गमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. (heavy rain in Maharashtra many district) मॉन्सूनच्या (monsoon update) पुढच्या प्रवासात कोणतीही अडचण नसल्याने प्रवास वेगाने सुरू आहे. मॉन्सूनने मागच्या 24 तासांत निम्मा महाराष्ट्र व्यापल्याचे हवामान खात्याकडून (imd alert) सांगण्यात आले. उद्यापर्यंत (ता. 15) मॉन्सून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्यापर्यंत (ता. 15) मॉन्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू व्यापून, विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 17) ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये देखील मॉन्सून पोचण्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला यामध्ये कोकणातील मालवण परिसरात 70 मिमी पावसाची नोंद झाली तर दोडामा परिसरात 40, अलिबाग, सांवतवाडी यासह कोकणातील इतर भागात सरासरी 20 मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील धुळे, शहादा येथे प्रत्येकी 40, दौंड, नांदगाव, सुरगाणा, प्रत्येकी 30, मालेगाव, सावळीविहीर, सिंधखेडा 20, मराठवाड्यातील अंबड तालुक्यात 30मिमी पावसाची नोंद झाली, खुलताबाद, बदनापूर, कन्नड, भोकरदन या भागात 20. तर विदर्भ देऊळगाव राजा, सिरोंचा येथे 30 मिमी पावसाची नोंद झाली, लोणार, बुलडाणा प्रत्येकी 20मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 32.9, धुळे 38.0, कोल्हापूर 29.6, महाबळेश्वर 22.3, नाशिक 32.3, निफाड 36.8, सांगली 32.6, सातारा 31.2, सोलापूर 36.2, रत्नागिरी 31.1, औरंगाबाद 34.4, परभणी 32.2, अकोला 35.0, अमरावती 36.0, बुलडाणा 37.4, ब्रह्मपुरी 39.4, चंद्रपूर 38.0, गोंदिया 36.6, नागपूर 36.9, वर्धा 38.0, यवतमाळ 36.0 तापमानाची नोंद झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने सलग दुसऱ्या दिवशीही काही भाग सोडल्यास दमदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकरी राजा मात्र सुखावला आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र काल झालेल्या पहिल्या मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे काही भागात जीवनमान विस्कळीत झाले होते. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *