महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ जून । म्हाडा मोरवाडी। वट पौर्णिमेनिमित्त निमित्त म्हाडा मोरवाडी येथील महादेव मंदीर परीसरात वृक्षारोपण करण्यात आलेआज वटपौर्णिमा महिलांसाठी आजचा दिवस तसा महत्वाचा या परीसरात तील महिलांनी वृक्षारोपण करण्याचे ठरविले सहा सात महिलांनी मिळुन महादेव मंदीर परीसरात ४ वड १ कडू लिंबाचे आणि १ पेरू अशी झाडे मोकळ्या जागेत लावण्यात आली.
यावेळी कै.नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठान च्या व दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या विभाग प्रमुख सौ. रेणुका भोजने , महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस सौ. रोहिणी रासकर सौ. पल्लवी मारकड , श्रीमती शोभा खरात ,बेबी गावडे विद्या गावडे , व तेथे वडाच्या पूजा करायला आलेल्या महिला ही सहभागी झाल्या आणि आनंदी ही झाल्या .झाडे लावा झाडे जगवा अशा संदेश या महिलांनी वृक्षारोपण करून सर्वात पुढे एक नवीन आर्दश निर्माण केला त्यांचे म्हाडा मोरवाडी परिसरात कौतुक होत आहे .