महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे ; महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज (ता. १३) आतापर्यंत एकूण ८२ रुग्णांची भर पडली आहे. आता महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही २ हजाराच्या वर गेली असून ती ०२ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. आज (ता. १३) रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात ८२ नव्या करोना रुग्णांची भर पडली असून त्यापैकी एकट्या मुंबईत ५९ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.
मुंबई : ५९
मालेगाव-१२
ठाणे : ५
पुणे : ३
पालघर : २
वसई-विरार : १