महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : संपूर्ण जगावार कोरोनाच सावट असताना आता आर्थिक मंदीचा प्रश्न देखील उभा राहिला आहे. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या एका महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात सोन्याची किंमत ही सर्व रेकॉर्ड मोडणारी नोंदवली जाणार आहे.
दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४६,००० रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. हा दर जवळपास साडे सात सालच्या उंचीवर पोहोचला आहे. यामुळे भारतीय सोन्याच्या बाजारातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सात एप्रलला सोन्याच्या बाजारात ४५,७२० असा सोन्याचा दर होता. जो स्तर आतापर्यंत सर्वात उंच होता. मात्र या आठवड्यात सोन्याचा दर हा उच्चांक गाठणार असून ४६,००० रुपये इतका होणार आहे.