महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । ज्यात अद्यापही मान्सून (MONSOON) सक्रीय नसल्याने राज्यात पाणी टंचाई होण्याची शक्यता (Water scarcity is likely in Maharashtra)आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. (The water level in the dams reached the bottom) यामुळे अनेक जिल्ह्यात पाण्याची टंचाई पुढच्या काही काळात जाणवणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून धरणामध्ये पाणी नसल्याने काही जिल्हे पावसाच्या प्रतिक्षेत आहेतच. राज्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात पाण्याची भीषण अवस्था (Extreme levels of flood danger were announced in Pune district) झाली आहे. मागच्या महिन्याच्या 15 मे पर्यंत पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये (pune water crisis) सरासरी 34.11 टक्के पाणीसाठा होता तो आता अवघ्या 20 टक्क्यांच्या आसपास आला आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून, आठ धरणे कोरडी पडली आहेत. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पुणे जिल्ह्यात लहान मोठी एकूण 26 धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अति उष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा 21.92 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
येत्या काळात पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर पिंपळगाव जोगे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, मुळशी, टेमघर, नाझरे, उजनी ही धरणे कोरडी पडली आहेत. दहा धरणांत अत्यल्प म्हणजेच एक टीएमसीहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
उर्वरित धरणात अल्प पाणीसाठा आहे. सध्या येडगाव धरणातून डाव्या कालव्याला 1400, चासकमान धरणातून 560, तर वीर धरणातून 827 क्युसेकने विसर्ग सोडलेला आहे. खडकवासला धरणातून उजव्या कालव्याला 1134, वीर धरणातून 1003 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान असून काही भागात पाऊस होत आहे.
परंतु धरणातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून येत्या दहा ते पंधरा दिवसांत जोरदार झाल्यास ही धरणे पुन्हा धरणांत पाण्याची आवक सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) माणिकडोह 0.75, येडगाव 0.73, वडज 0.11, डिंभे 0.81, कळमोडी 0.10, चासकमान 0.66, भामा आसखेड 2.56, वडिवळे 0.11, आंध्रा 1.73, पवना 1.88, कासारसाई 0.16, वरसगाव 1.86, पानशेत 1.72, खडकवासला 0.43, गुंजवणी 0.84, नीरा देवघर 1.46, भाटघर 1.94, वीर 4.07, उजनी 1.79 इतकी आहे.