देहूतील कार्यक्रमात भाषण नाकारणे प्रकरणावर अजितदादा पहिल्यांदाच बोलले, म्हणाले..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये (pm narendra modi inauguration of sant tukaram temple) राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला होता. पण, आता या प्रकरणावर मला काहीही बोलायचे नाही. पंतप्रधान आता दिल्लीत पोहोचले आहेत. कार्यक्रम चांगला झाला होता, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली.

बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत भाष्य केलं. यावेळी देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात भाषण करू दिली नाही, या प्रकरणावर पहिल्यांचा आपली बाजू मांडली.

‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काही बोलायचं नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दिल्लीत पोहचले आहेत. देहुत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे ठिकाण आहे मोठ्या प्रमाणात वारकरी आले होते, पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी सगळी पाहणी केली होती ‘ असं अजित पवार म्हणाले.

‘आमचं इथं बरं चाललं आहे. कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं म्हणत अजितदादांनी विखे पाटलांनी भाजपसोबत येण्याचे दिलेले आमंत्रण धुडकावून लावले.

‘विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आधी देखील प्रमुख नेत्यांची बैठक झालीय. प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडून आणणे ही त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे. निवडणुकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते असं म्हटलं जातं. विधानपरिषद निवडणुकीनंतर कळेल कोणाकडे कौशल्य आहे आणि कोणाकडे काय आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना एकत्र केलं जातंय. अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यात येतोय, असंही अजितदादा म्हणाले.

ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक घेणार आहोत. काही नावे ही सर्व जातीमध्ये आढळतात. नावांवरून ओबीसी ठरवता येणार नाही, अशी माहिती अजितदादांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *