Monsoon 2022 : ‘मान्सून इज बॅक’, विदर्भात पावसाची दमदार एन्ट्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । राज्यातील अन्य भागासह विदर्भात सुद्धा मान्सून दाखल झाला आहे. विदर्भात गुरुवारी चंद्रपूर मार्गे मान्सून दाखल झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली. केंद्रीय हवामान खात्याने जाहीर केलेल्या नकाशानुसार बुधवारपर्यंत मान्सून ओडिसापर्यंत सुद्धा पोहोचलेला नव्हता. मात्र, गेल्या चोवीस तासात मान्सूनने चांगलीच मुसंडी मारली आहे.

मध्यंतरी मान्सूनचा वेग मंदावला होता. आता मात्र मान्सूनने चांगलीच गती घेतली आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत मान्सून गोंदियापर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात चंद्रपूर मार्गे मान्सूनची एन्ट्री झाली आहे हे स्पष्ट आहे. तसेच, पश्चिम विदर्भात बुलढाणा अमरावती या मार्गाने मान्सून दाखल झाला आहे. या आठवड्याच्या अखेरीस पूर्ण विदर्भ मान्सूनने व्यापलेला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात ‘मान्सून इज बॅक’

राज्यात ब्रेकवर असलेल्या मान्सूनने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा नक्कीच मिळाला आहे. हवामान खात्याकडून राज्यात येत्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार आज पहाटे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.

राज्यात मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच, शेतीकामांनाही वेग आला आहे. खरंतर, रविवारनंतर राज्यात पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता पाऊस पुन्हा सक्रीय होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *