महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । दलित समाजावरील अवमानकारक पोस्टप्रकरणी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल महिनाभरापासून केतकी ही तुरुंगात कैद आहे. तिला जामीन मिळाला असला तरी अद्याप ती तुरुंगातून बाहेर येणार नाही. कारण शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तिला जामीन मिळालेला नाही.
केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातीच्या व्यक्तिंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टप्रकरणी ऍड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
वादग्रस्त पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांचा उल्लेख असलेल्या अत्यंत अश्लाघ्य भाषेत लिहिलेली कविता फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टबाबत शिवसेना, रात्याष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी केतकीविरोधात कारवाईची मागणी केली. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत तिच्यावर गुन्हे दाखल झाले. त्या प्रकरणी देखील ती तुरुंगात कैद आहे.