महत्वाची बातमी ; यानुसार वीज बिलाच्या आकारणीला सामोरे जावे लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : वीज वितरण कंपनीकडून दर महिन्याला घरी येऊन मीटरचे रीडिंग घेतले जाते. एखाद्या रीडिंग नेण्याच्या वेळेस घर बंद असल्यास त्या महिन्याचे सरासरी बिल दिले जाते. त्याच धर्तीवर कोरोनामुळे 22 मार्चपासून लागू झालेल्या संचारबंदीमुळे वीज मीटरचे रीडिंग घेणे बंद केले आहे. त्यामुळे 22 मार्चनंतर रीडिंग घेतल्या जाणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या संदेशानंतर 24 तासात मीटर रीडिंग वीज कंपनीच्या ऍपवर अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, अन्यथा संबंधित ग्राहकांना सरासरी बिल आकारणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच वीज ग्राहकांना लॉकडाउन उठेपर्यंत यापुढे यानुसार वीज बिलाच्या आकारणीला सामोरे जावे लागणार आहे.

वीज कंपनीने दरमहा घरोघरी मीटरचे रीडिंग घेणे अडचणी झाले आहे. त्यामुळे 22 मार्चपासून घरोघरी जावून मीटर रीडिंग घेणे वीज कंपनीने बंद केले आहे. त्याऐवजी वीज कंपनीने ग्राहकांना वीज कंपनीच्या मोबाईल ऍपद्वारे स्वतः मीटर रीडिंग अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. तसे आवाहनही वीज कंपनीकडून केले आहे. मात्र, अनेक ग्राहक या ऍपचा वापरच करत नसल्याने नेमके रीडिंग अपलोड करायचे कसे? हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. 22 तारखेनंतर ज्या ग्राहकांच्या मीटर रीडिंग होणार होते, त्यांनी त्यांच्या मोबाईवर आलेल्या संदेशानंतर संबंधित ऍपवर 24 तासांच्या आत मीटर रीडिंग अपलोड करणे अनिवार्य आहे. या कालावधीत ग्राहकांकडून रीडिंग अपलोड न झाल्यास संबंधित ग्राहकांना ज्याप्रमाणे दरवाजा बंद असल्यावर एखाद्या महिन्यात सरासरी बिल येते, त्या पध्दतीने यावेळेस सरासरी बिल देण्याचा मार्ग वीज वितरण कंपनीने उपलब्ध केला आहे. त्यामुळे सध्या 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत रीडिंग अपलोड न झालेल्यांना मार्च महिन्याचे सरासरी बिल येणार आहे. एक ते 14 एप्रिल यासह राज्यात 30 एप्रिलपर्यंत वाढवलेल्या लॉकडाउन काळामुळे ग्राहकांना एप्रिल महिन्याचे सरासरी बिल येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *