महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. १७) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे दिली. जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. २०) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक काढणार आहे.
निकाल कुठे पाहाल
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० ते २९ जून
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० जून ते ९ जुलै