मान्सून : राज्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा ; पहा कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । विदर्भातील एक टक्का भाग वगळता मान्सून गुरुवारी (१६ जून) राज्यातील ९९ टक्के भागात दाखल झाला. आठवड्यापूर्वी मान्सूनने राज्यात प्रवेश करूनही अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. मात्र, आजपासून चार दिवस राज्यामध्ये मोसमी पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. ठिकठिकाणी हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात कोकण वगळता अन्य ठिकाणी चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नैऋत्य मान्सून आता उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागामध्ये पुढे सरकला आहे. गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेशातील काही भाग, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग, दक्षिण ओडिशा, आंध्र प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे.

* ग्रीन अलर्ट (१८ ते २० जून)
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

* ऑरेंज अलर्ट (२० जून)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

* यलो अलर्ट (१८ ते २० जून)
कोकण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *