Weather Forecast : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘yellow alert’, पुढचे तीन दिवस मुसळधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ जून । मागच्या पंधरा दिवसांपासून मान्सून (monsoon) आला अशी माहिती हवामान विभागाकडून (imd alert) मिळत आहे. परंतु मान्सून सक्रिय जरी असला तरी महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra monsoon update) येण्यासाठी विलंब होत असल्याचे कारण पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून थांबला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. 19 ते 21 जून या कालावधीत घेणार असून, राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ (yellow alert))चा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मान्सून पोहोचला असल्याचीही माहिती देण्यात आली. (weather forecast)

यंदा मान्सूनला विलंब झाला असला तरी काही भागात मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांना याचा आधार मिळाला आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय असला तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात पाऊस पाडण्यात अपयशी ठरतो आहे. मात्र, 19 जूनपासून परिस्थितीत किंचित बदल होत असून, पंधरा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सूनने गुजरात राज्यात प्रवेश केला.

ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी : 20 ते 21 जून – सिंधुदुर्ग: 18 ते 21 जून

यलो अलर्ट : 19 ते 21 जून

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

राज्यातील पाऊस (मिमीमध्ये)

कोकण : वैभववाडी-50, खालापूर- 40, वालपोई-30, कणकवली-30, सावंतवाडी – 30, रत्नागिरी- 20, ठाणे – 10 विदर्भ : अकोला – 90, खामगाव – 50, चिखली – 40, बाळापूर – 30, तेल्हारा – 20, धामणगाव रेल्वे-20, नांदुरा-10, मराठवाडा : उदगीर – 40, जळकोट- 40, सोनपेठ-40, वडवणी – 30, अहमदपूर – 20, मानवत – 20, परळी वैजनाथ – 20, सेलू – 10, मध्य महाराष्ट्र : खाकरी-20, महाबळेश्वर-20 गुजरखेडा-20 घाटमाथा : लोणावळा, खोपोली, अंबोणे- 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *